Velankar Chafa

270.00

Availability: 50 in stock

Use up to 270 points to purchase this product!
Guaranteed Safe Checkout

वेलणकर चाफा घरी आणल्या नंतर सेमी शेडमध्ये पाण्याचे नियोजन करून किमान 3 दिवस ठेवावा, लगेच रिपोटिंग करू नये.

वेलणकर चाफ्यासाठी कुंडी कशी भरावी याविषयी माहिती खालील प्रमाणे आहे

1. कुंडी कमीत कमी 2*2 फूट असावी जेणेकरून मुळांना वाढण्यासाठी पुरेशी जागा मिळेल. फुले येण्यासाठी मुळांची वाढ होणे गरजेचे आहे.

2. मातीची, सिमेंटची किंवा प्लास्टिकची कुंडी असेल तरी चालेल. किंवा अर्धा कापलेला ड्रम घेतला तरी चालेल.

3. पाण्याचा व्यवस्थित निचरा होण्यासाठी कुंडीच्या तळाला चार होल असावेत तसेच बाजूलाही होल असावेत.

4. रोप घरी आल्यावर त्याला 3 दिवस सेमी शेड मध्ये ठेवावं. दिवसातून एकदा थोडंस पाणी द्यावे

5. सगळ्यात खाली 4 इंचापर्यं खडीचा थर लावावा.

6. तीन भाग शेन्यांची पूड व सात भाग लाल निचऱ्याच्या मातीचे मिश्रण

7. हे मिक्स 16 किंवा 17 इंचापर्यंत भरावं.

8. मिक्स एकदम भुसभुशीत असावं.

9. कोकोपीट वापरु नये. कुंडीत पाणी धरून ठेवणारी कोणतीही वस्तु वापरू नये.

10. अश्या मिक्स मध्ये रोप लावतांना, रोपाची काळी पिशवी काढुन घ्यावी आणि रोप जसंच्या तसं अलगद कुंडीत ठेऊन बाजूने हे मिक्स पसरेल अश्या प्रकारे लावावं.

11. कलमाचा भाग हा मातीच्या लेव्हलच्या वर राहील याची काळजी घ्यावी.

12. महिनाभर सेमी शेड मध्ये ठेऊन मग त्याला बाहेर पावसात किंवा उन्हात नेऊन ठेवले तरी चालेल.

उन्हात ठेवताना फक्त सकाळ ते 2 ऊन मिळेल असे ठेवावे. नंतर च्या उन्हास ग्रीन शेड लावून घडवावे.

उन्हाळ्यात गर्मी कितपत आहे त्या प्रमाणे त्याला सेमी शेड ग्रीन शेड करावी.

13. जिथे कलम केलेलं आहे तिथे प्लास्टिक बांधलेलं आहे. काही दिवसांनी, त्याचे तिथे वळ पडलेले दिसतील. वळ पडल्यावर, साध्या ब्लेडने ते हळूच कापून घ्यावे. रोपाला धक्का लागु देऊ नये.

14. परिस्थिती नुसार दर 10 किंवा 15 दिवसांनी जीवामृत द्यावे. जीवामृत घरी कसं बनवायचं याची कृती वेगळी दिली आहे.

15. पाणी गरजेनुसार द्यायचे. जास्त पाणी दिलं तर मुळं खराब होण्याची भीती असते. म्हणून नेहमी पाण्याचा निचरा होणारी माती मिक्स वापरावी.

16. पाणी टाकण्यापूर्वी मातीत बोट जाते का ते बघावे म्हणजे माती घट्ट झाली आहे की भुसभुशीत आहे ते कळेल आणि त्यानुसार थोडे पाणी टाकावे.

17. पाणी जास्त झाले तरी ते खालुन वाहुन बाहेर पडले पाहिजे ह्याची काळजी घ्यावी

18. ह्या रोपाला भरपूर सूर्यप्रकाश लागतो. तर ते भरपूर फुलं देतं.

19. जर कमी सूर्यप्रकाश असेल तर निदान 2 तास तरी सूर्यप्रकाश मिळायला हवा. कमी सूर्यप्रकाश मिळत असेल तर फुलं कमी प्रमाणात येतील.

20. घरातील ओला कचरा कुंडीत टाकू नये

21. जर कुंडी लहान घेतली तर एक ते दीड वर्षात रिपॉट करायला लागेल. फुले कमी येणें, पाने मलुल दिसणे, नवीन पालवी न फुटणे अशी काही लक्षणे दिसल्यानंतर रिपॉट करण्याची वेळ आली आहे असे समजावे.

22. बाजूंच्या झाडांमुळे सोनचाफ्याला मिलीबग्स ची लागण होऊ शकते. तरी कोणत्याही प्रकारची कीड लागल्यास तंबाखूचे पाणी पानाच्या वरून खालून स्प्रे करावे

23. (महत्वाचा मुद्धा) कलम केलेल्या भागाच्या खालून जर नवीन फुटवे येत असतील तर ते वेळीच काढून टाकावे. अश्या फांदीच्या पानांत व कलम केलेल्या फांदीच्या पानात फरक दिसेल. अश्या फांद्यांना फुले येत नाहीत.

Velankar Chafa FlowerVelankar Chafa
270.00

Availability: 50 in stock

Use up to 270 points to purchase this product!
1
YOUR CART